खेड मधील गैरवर्तनप्रकरण, दोघंही होते एकाच खोलीत
खेड:-काँग्रेसच्या पर्यावरण विभागाचे जिल्हाध्यक्ष किरण तायडे यांच्या पदमुक्तीनंतर पक्षातून निलंबनाची कारवाई केलेली असताना ‘त्या’ महिलेनेही येथील पोलीस स्थानकात गैरवर्तन केल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. त्यानुसार किरण तायडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याने अडचणीत आणखी वाढ झाली आहे.
किरण तायडे यांना त्यांच्या कार्यालयात महिलेसमवेत रंगेहाथ पकडल्यानंतर जमावाने बेदम मारहाण केली होती. मारहाणीसह जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार किरण तायडे यांनी दिल्यानंतर 20 ते 25 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. यात काही महिलांचाही समावेश आहे. पक्षाच्या विचारधारेला बाधा पोहोचवून पक्षाची बदनामी केल्याचा ठपका ठेवत पदमुक्तीसह पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. या पाठोपाठ त्या महिलेनेही गैरवर्तन केल्याची तक्रार दिल्यानंतर किरण तायडे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली असून प्रकरणाला नवे वळण लागले आहे.