मुंबई : हल्ली सर्वांच्याच घरात पाली, मुंग्या, झुरळं, किडे पडतात. मात्र यामुळे आता चिंता करण्याचं काही कारण नाही. पाली घरभर फिरतात. झुरळं आणि पालींना पाहून आपल्याला किळसवाणे वाटते, पण याशिवाय यांच्यामुळे घरात रोगराईही पसरते जेवणात किंवा भांड्यांजवळ झुरळं आणि पाली फिरल्याने पदार्थ विषारी होते.
किचनमध्ये कधी झुरळं आणि पाली फिरतील हे सांगता येत नाही. त्यामुळे वेळीच यांचा बंदोबस्त केलेला बरा. जर घरात झुरळं आणि पालींचा वावर वाढला असेल तर, केमिकल रसायनयुक्त उत्पादनांचा वापर करण्यापेक्षा डांबर गोळीचा सोपा उपाय करून पाहा. काही मिनिटात पाली, झुरळं घरातून गायब होतील.
सर्वात आधी एका भांड्यात पाणी गरम करण्यासाठी ठेवा. पाणी कोमट झाल्यानंतर त्यात एक डांबर गोळी टाका. डांबर गोळी वितळल्यानंतर त्यात एक कापूर घालून मिक्स करा. डांबर गोळी आणि कापूर पाण्यात वितळल्यानंतर गॅस बंद करा. तयार पाणी थोडं थंड झाल्यानंतर एका स्प्रे बॉटलमध्ये भरा. नंतर त्यात २-३ चमचे फ्लोअर क्लीनर लिक्विड घालून मिक्स करा. अशा प्रकारे आपलं पाली, मुंग्या, झुरळण्याना पळवणारं स्प्रे तयार. ज्या ठिकाणी पाली आणि झुरळ यांचा वावर आहे. त्या ठिकाणी स्प्रे करा. डांबर गोळीच्या उग्र वासामुळे किडेही मरून जातील.