गुहागर/उदय दणदणे:-गुहागर मतदार संघाचे भावी आमदार म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते असे उद्योजक तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त दि.२६ सप्टेंबर २०२४ रोजी गुहागर मतदारसंघात विविध उपक्रम राबविण्यात येणार असून, प्रमोद गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली,अपरांत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चिपळूण यांच्या सहकार्याने जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे,त्यात कान,नाक,घसा,डोळे,रक्त गट अशी मोफत आरोग्य तपासणी सह मोफत औषध,मोफत चष्मा वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर शिबीर महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखा-मुंढर (शिरबाडवाडी) येथे गुरुवार दिनांक.२६ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी १० ते दुपारी ०२ वाजेपर्यंत ठेवण्यात आले.जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ह्या मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा,अधिक माहितीसाठी पुढील ७०२०४२१९०२ ह्या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन गुहागर मनसेच्या वतीने करण्यात आले आहे.