खेड/प्रतिनिधी:-तालुक्यातील देवसडे-मधलीवाडी येथील 56 वर्षीय प्रौढाचा सोमवारी लोटे येथील साई रुग्णालयामध्ये आकस्मिक मृत्यू झाला. रवींद्र देवळे असे मृत प्रौढाचे नाव आहे. ते लोटे पटवर्धन येथील सावंत यांच्याकडे भाड्याने वास्तव्यास होते. त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. वैद्यकीय अधिकाऱ्यानी तपासले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले. या प्रकरणी येथील पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.