गुहागर:-गुहागर तालुक्यातील झोंबडी येथील गावठी हातभट्टीवर व आवरे ते कुडली येथील मुख्य मार्गावर देशी विदेशी दारू बाळगणाऱ्यावर गुहागर पोलिसांनी कारवाई केली.
तालुक्यातील झोंबडी गावातील ग्रामदेवता मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यालगत माळरानात गावठी हातभट्टीची 5 लिटर रूपये 550 किंमतीची दारू मिळून आली. याप्रकरणी अजित मनोहर तावडे याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियन 1949 कलम 65(ई) प्रमाणे गुन्हा नोंद केला आहे, तर तालुक्यातील मौजे आवरे ते कुडली माटलवाडी रस्त्याच्या बाजूला आडोशाला 510 रूपये किंमतीची देशी व विदेशी बनावटीची बिगर परवाना दारू मिळून आली. याप्रकरणी सुरेश मुलु गोताड यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 कलम 65 (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.