मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कार्यक्रम
लांजा : येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था लांजा येथे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत गुरुवार २६ सप्टेंबर २०२४ रोजी तालुक्यातील बेरोजगार तरुणांसाठी भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या मेळाव्यात बारावी, आयटीआय, डिप्लोमा, पदवी पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या १८ ते ३५ वयोगटातील तरुण तरुणींना मार्गदर्शन करण्यासाठी विविध उद्योग, कंपन्या, कारखाने व आस्थापनांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. तरी तरुण-तरुणींनी या संधीचा फायदा घेण्यासाठी उपस्थितीत रहावे असे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्था लांजाचे प्राचार्य एम.बी.गवई यांनी केले आहे.