राजापूर : तालुक्यातील मौजे धाऊलवल्ली मधील सर्वे न. ११३/११ मधील क्षेत्र १.४५.०० मध्ये श्री. विनायक रमन बांदकर ( नाटे, बांदचा वाडा, राजापूर) यांनी खाडी लागतं असलेली कांदळवनची झाडें सुमारे सहा महिने अगोदर तोडली आहेत. सदर विषयी वनपाल राजापूर, वनविभाग राजापूर यांनी महाराष्ट्र झाडे तोडण्याबाबत अधिनियम आणि कांदळवन विभाग अधिनियम यांचा आधारे चौकशी करून योग्य ती कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी करणारे लेखी पत्र रुपेंद्र विलास कोठारकर धाऊलवल्ली यांनी राजापूर वन विभागाला दिले आहे.