उपजिल्हाधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ. जासमिन यांची माहिती
राजापूर | प्रतिनिधी :267 राजापूर विधानसभा मतदार संघाच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमानुसार अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली असून एकूण मतदार 2 लाख 36 हजार 61 इतके मतदार या मतदार संघात आहेत. यामध्ये एकूण स्त्री मतदारांची संख्या 1 लाख 23 हजार 268 इतकी असून पुरुष मतदारांची संख्या 1 लाख 12 हजार 793 इतकी आहे. तशी माहिती उपजिल्हाधिकारी तथा राजापूर प्रांताधिकारी डॉ. जासमिन यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
तर राजापूर लांजा साखरपा विधानसभा मतदार संघात चार नवीन मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली असून आता एकूण मतदान केंद्राची संख्या 345 इतकी झाली आहे. नव्याने निर्माण करण्यात आलेल्या मतदान केंद्रामध्ये लांजा तालुक्यात तीन तर राजापूर तालुक्यात एका मतदान केंद्राचा समावेश असल्याचे डॉ. जासमिन यांनी सांगितले. लांजा तालुक्यातील केंद्र क्रमांक 27 पोचरी व केंद्र क्रमांक 33 चिंचुर्डी या केंद्रावर जाण्यासाठी मतदारांना 5 कि.मी. पेक्षा जास्त अंतर चालावे लागत असल्याने सदर ठिकाणी केंद्र क्रमांक 34 चिंचुर्डी धावडेवाडी व केंद्र क्रमांक 94 विवली या केंद्रावर जाण्यासाठी केळंबे येथील मतदारांना चार किलो मिटर अंतर मतदानासाठी जावे लागत असल्याने केळंबे येथे नवीन केंद्र क्रमांक 97 केळंबे, केंद्र क्रमांक 84 लांजा येथे मतदार संख्या 1456 झाली असल्याने त्या ठिकाणी केंद्र क्रमांक 86लां जा अशी 3 नवीन मतदान केंद्रे करण्यात आली आहेत.
तर राजापूर तालुक्यातील साखरी नाटे येथे 3 PSL असून त्यामध्ये 1 केंद्राची 277 साखरी नाटे येथे मतदार संख्या 1400 पेक्षा जास्त झाल्याने नवीन मतदान केंद्र 281 साखरी नाटे असे राजापूर तालुक्यात 1 नवीन केंद्र करण्यात आले आहे.
राजापूर विधानसभा मतदार संघात एकुण 4 नवीन मतदान केंद्रे करण्यात आली आहेत. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मध्ये 341 मतदान केंद्र होती. आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीत 345 मतदान केंद्र असणार आहेत. दिनांक 01 जुलै 2024 या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम अंतर्गत प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्यात आलेली होती त्यावेळी 267- राजापूर विधानसभा मतदार संघात एकूण 2 लाख 34 हजार 109 एकूण मतदार होते त्यानंतर अंतिम मतदार यादी प्रसिध्द झालेली आहे. त्यामध्ये एकूण 2 लाख 36 हजार 61 मतदार आहेत. त्यामध्ये जेष्ठ नागरिक मतदारांची संख्या 4 हजार 421, युवा मतदार 3 हजार 846 व दिव्यांग 1
हजार 333 मतदार आहेत. आगामी विधानसभा निवडणूकीसाठी मतदार यादीमध्ये आपले नांव तपासणी करावे. ज्याचे नांव मतदार यादीतून वगळणी झाले आहे किंवा ज्याचे नांव मतदार यादीत नविन आपले नांव सामाविष्ट करणेसाठी अर्ज करावा. असे आवाहन डॉ. जामसिन यांनी केले आहे. या पत्रकार परिषदेला तहसीलदार विकास गंबरे, लांजा तहसीलदार प्रियंका ढोले, नायब तहसीलदार दीपक कुळये उपस्थित होते.