मुंबई येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार, रत्नागिरी शहरातील २ घरफोड्या उघडकीस
रत्नागिरी:-रत्नागिरी शहरातील गजबजलेल्या मारुती मंदिर येथील घरफोडी प्रकरणातील अटक चोरट्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने ताब्यात घेतले आहे. स्वप्नील राजाराम मयेकर (38 वर्षे मूळ रा. सेक्टर 19, खारघर, जिल्हा रायगड सध्या रा. छाया गेस्ट हाऊस, रत्नागिरी) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.
सविस्तर वृत्त असे की, 14 सप्टेंबर रोजी रात्री 10 वा. चे सुमारास मारुती मंदीर परिसरातील दोन अपार्टमेंटमध्ये ओमकार डेव्हलपर्स व स्टार इन्सुरन्स कंपनी यांचे ऑफिस फोडून चोरी करुन त्यामधून रोख रक्कम व सीसीटीव्ही डिव्हीआर चोरुन नेण्यात आलेला होता. त्याबाबत रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या घरफोड्यांच्या अनुषंगाने रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. धनंजय कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक, श्रीमती जयश्री गायकवाड यांनी गुन्हे उघडकीस आणण्याच्या दृष्टीने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस सुचना दिलेल्या होत्या. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. नितीन ढेरे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे एक पथक तात्काळ नियुक्त करुन गुन्हयाचा समांतर तपास सुरु केला.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या तपास पथकाने घटनास्थळावरील तसेच घटनास्थळाच्या आजूबाजूस असलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तसेच गोपनीय बातमीदाराद्वारे मिळालेल्या माहीतीवरुन सदरचे दोन्ही गुन्हे हे मुंबई येथील रेकॉर्डवरील आरोपी स्वप्नील राजाराम मयेकर याने केलेले असल्याचे निष्पन्न केले. त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने ठाणे, नवी मुंबई, मुंबई व रत्नागिरी इत्यादी ठिकाणी आरोपी स्वप्नील मयेकर याचा अहोरात्र शोध घेवून गोपनीय माहीतीच्या आधारे 22 सप्टेंबर रोजी त्यास मुंबई येथून ताब्यात घेण्यात आले. सदर गुन्हयातील आरोपी स्वप्निल राजाराम मयेकर यांने वर नमुद दोन्ही गुन्हयाची कबुली दिलेली असून गुन्हयात चोरीस गेलेला मुद्देमाल, गुन्हा करण्यासाठी वापरलेले साहीत्य त्याचेकडून जप्त करण्यात आलेले आहे. तसेच एल.टी.मार्ग पो. ठाणे मुंबई व पनवेल शहरामध्येही गुन्हे केल्याची कबुली दिलेली आहे.
उघडकीस आलेले गुन्हे
1. रत्नागिरी शहर पोस्ट. ठाणे गु.आर.नं.351/2024 बी.एन. पेन 331 (3), 331 (4), 305
2. रत्नागिरी शहर पोस्ट. ठाणे गु.आर.नं.353/2024 बी.एन. पेन ३३१ (३), ३३१ (४) ३०५,३२४(४)
3. एल.टी. मार्ग पो. ठाणे मुंबई गु.आर. क्रमांक ५०५/२०२४ B.D.V. पेण 457, 380
4. पनवेल शहर पो. ठाणे गु.र.नं. 540/2024 B.N. द्वारे ३०५, ३३१(३)(४), ३२४(४), इ.
आरोपी स्वप्निल राजाराम मयेकर हा मुंबई व ठाणे येथील रेकॉर्डवरील सहाईत गुन्हेगार असून त्याचेवर मुंबई, ठाणे, नवी मुंबई इत्यादी ठिकाणी चोरी घरफोडीचे सुमारे 20 गुन्हे दाखल आहेत. तसेच गुजरात व गोवा या राज्यामध्ये सुध्दा गुन्हे केलेले आहेत.
सदरची कारवाई पोलीस निरीक्षक श्री. नितीन ढेरे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील खालील नमुद पोलीस अधिकारी / अंमलदार यांनी केलेली आहे.
ही कामगिरी सपोनि/ श्री.तानाजी पवार, पोहेकों/ विजय आंबेकर, पोहेकों योगेश नार्वेकर पोहेकों / दिपराज पाटील, पोकों/ अतुल कांबळे, पोहेकों / शांताराम झोरे, पोहेकों / विवेक रसाळ, पोहेकॉन / रमीज शेख यांनी कामगिरी पार पाडली.