खेड:-मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटात दुचाकीला धडक देवून अपघात केल्याप्रकरणी बसचालक बाळाजी भीमराव गायकवाड (37, रा. आटपाडी-सांगली) यांच्यावर खेड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंदार मधुकर कोलपे (33, रा. चिपळूण) यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. ते एम.एच.08/बी.एफ.6343 क्रमांकाच्या दुचाकीवरून चिपळूण येथून भरणे कडे जात होते. भोस्ते घाट उतरत असताना गतिरोधकामुळे दुचाकीचा वेग कमी केला असता पाठीमागून येणाऱ्या प्रशिक्षण वाहनातील बस चालकाने दुचाकीला धडक दिली. यात कोलपे याना दुखापत झाली. त्यानुसार बस चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला.