रत्नागिरी:-रत्नागिरी मनसे तालुका अध्यक्ष रुपेश जाधव यांना मारहाण केल्याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात 6 संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनसेचे शहर अध्यक्ष अद्वैत कुलकर्णी याच्यासह अन्य पाचजणांचा यामध्ये समावेश आहे.
गेल्या 3 सप्टेंबरला रात्री 9 च्या सुमारास मनसे तालुका रुपेश जाधव यांना ही मारहाण झाल्याची घटना घडली होती. जाधव आपल्या कार्यालयातून घरी जाण्यासाठी गाडीत बसत असताना मारहाण केल्याची तक्रार रुपेश जाधव यांनी शहर पोलीस ठाण्यात दिली होती. त्याप्रमाणे संशयित आरोपी म्हणून रुपेश श्रीकांत चव्हाण, राहुल दीपक खेडेकर, आशिष मल्लेश कट्टी मणी, सचिन सदानंद शिंदे, सिकंदर यासीन खान आणि मनसेचे शहराध्यक्ष अद्वैत सतीश कुलकर्णी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा हल्ला जिल्हाध्यक्षांच्या सांगण्यावरून केल्याचा आरोप रुपेश जाधव यांनी केला होता. त्या बाबत शहर पोलीस ठाण्यात रूपेश जाधव यांनी तक्रार नोंदवली. त्यावरून सहा संशयितांविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 118(1), 115(2), 352, 351(2) 189(2) 191 (2) 190, अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास शहर पोलीस ठाण्याचे पीएसआय पवन कांबळे करत आहेत.