राजापूर : तालुक्यातील सागरी पोलीस ठाणे नाटे येथे दरवर्षी गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात येते.
गणेशोत्सव आणि ईद च्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवत हे दोन्ही सण शांततेत पार पडावेत यासाठी पोलीस आपली कामगिरी पार पाडत आपल्या कार्यक्षेत्रातील बहुतांश घरगुती गणपती तसेच सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जनानंतर आज शुक्रवार दिनांक 20 सप्टेंबर 2024 रोजी सागरी पोलीस ठाणे नाटे येथे विराजमान असलेल्या राजाचे वाजत गाजत मिरवणुकीने नाटे पोलीस स्टेशन पासून बाजारपेठ मार्गे ठाकरे वाडी येथील खाडीमध्ये विसर्जन करण्यात आले.
या विसर्जन मिरवणुकीमध्ये सागरी पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश केदारी यांच्यासह सर्व पोलीस कर्मचारी, पोलीस पाटील व्यापारी मंडळाचे अध्यक्ष रमेश लांजेकर ,पत्रकार राजन लाड आदींसह ग्रामस्थ आणि व्यापारी सहभागी झाले होते.