चिपळूण : शहरातील वीज समस्यांबाबत वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर महाविकास आघाडीने गुरूवारी धडक देऊन मागणीचे निवेदन दिले. यावेळी वारंवार वीज पुरवठा खंडित होणे, एबीसी स्विच असूनही ते कार्यरत नसणे, तक्रार मोबाईल कायम बिझी असणे, झाडाच्या फांद्या वारंवार वायरवर पडून वीज पुरवठा खंडित होणे, नविन ट्रान्सफॉर्मर बसवणे, ग्राहकांना योग्य उत्तरे न मिळणे या विषयावर कार्यकारी अभियंता श्री. गेडाम यांच्याजवळ चर्चा झाली.
यावेळी त्यांनी या समस्या येत्या १५ दिवसात कमी होतील, त्याची अंमलबजावणी सुरू करत आहोत, असे आश्वासन त्यानी दिले. यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत यादव, शिवसेना उबाठाचे मतदार क्षेत्रप्रमुख बाळा कदम, तालुका प्रमुख विनोद झगडे, निर्मला जाधव, धनश्री शिंदे, स्वाती देवळेकर, प्राजक्ता सरफीरे, माजी नगरसेवक शशिकांत मोदी, रतन पवार, रहिमत जबले, वैशाली शिंदे, भय्या लाड, संतोष पवार, संजय रेडिज, पार्थ जागुष्टे, प्रशांत मुळे, सफा गोठे, तेजस्वनी किंजलकर, रुही खेडेकर, अंजली कदम, राधिका तटकरे, सीमा चाळके, माधुरी शिंदे, श्रीनाथ खेडेकर, मनोज पांचाळ, निलेश आवले, संदेश किंजलकर, अमिता कानडे, अर्चना कारेकर, सीमा चाळके, महेद्र कांबळी, सुशांत साळवी, अमोल टाकळे, अनामिका हरदारे, रसिका चौधरी, विना जावकर, सफा गोठे, नंदा भालेकर, इम्तियाज कडू, संजय साळवी, लियाकत शेख, गुलजार कुरवले, मंदार चिपळूणकर, शमुन घारे, दिनेश लटके आदी अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.