नवी दिल्ली:-आमचा आरक्षणाला विरोध नाही. काँग्रेस पक्षाने कायमच पाठिंबा दिला आहे. मात्र भारतात अजूनही वंचित गटाला मुख्य सामाजिक प्रवाहात स्थान नाही. भारतात अशी समानता येईल, त्यावेळी आरक्षण रद्द करण्याचा विचार करू, असे वक्तव्य कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले.
देशातील श्रीमंतांच्या यादीत एकही आदिवासी नाही, दलित नाही, ओबीसी नाही..ही परिस्थिती योग्य नाही. जोपर्यंत भारतात ही स्थिती नाही तोपर्यंत आरक्षण चालू रहायला हवे अशाच आशयाचे वक्तव्य राहुल गांधी यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यांनंतर देशभरात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
राहुल गांधी यांनी अमेरिकेच्या विद्यापीठात दिलेल्या व्याख्यानात भारतातील सामाजिक आणि राजकीय स्थितीवर भाष्य केले आहे. जेव्हा योग्य वेळ येईल, त्यावेळी काँग्रेस आरक्षण संपविण्याचा विचार करेल. पण सध्या ती योग्य वेळ नाही, असं राहुल गांधी काल एका कार्यक्रमात म्हणाले होते. त्यांच्या विधानावर त्यांच्या विरोधकांकडून टीका केली जात आहे. यावर आता राहुल गांधी यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. गांधी यांनी एक्स (ट्विटर) वर एक पोस्ट शेअर केलीय. यात त्यांनी त्यांच्या विधानाचं स्पष्टीकरण दिलं आहे. काल मी जे बोललो ते चुकीच्या प्रकारे पसरवलं जात आहे. माझा आरक्षणाला विरोध असल्याचं पसरवलं जात आहे. पण मी आरक्षणाच्या विरोधात नाहीये. तर मी आरक्षणाच्या बाजूने आहे.
भारतात अजूनही वंचित गटाला मुख्य सामाजिक प्रवाहात स्थान नाही. भारतात अशी समानता येईल त्यावेळी आरक्षण रद्द करण्याचा विचार करु असे वक्तव्य कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी या व्याख्यानात केले आहे. देशातील श्रीमंतांच्या यादीत एकही आदिवासी नाही, दलित नाही, ओबीसी नाही..ही परिस्थिती योग्य नाही. जोपर्यंत भारतात ही स्थिती नाही तोपर्यंत आरक्षण चालू रहायला हवे अशाच आशयाचे वक्तव्य राहुल गांधी यांनी केले आहे.
शीखांविषयीही आक्षेपार्ह वक्तव्य
राहुल गांधी पुढे म्हणाले, एक शीख व्यक्ती म्हणून त्यांना भारतात पगडी घालण्याची परवानगी मिळेल का? हाच खरंतर संघर्षाचा मूळ मुद्दा आहे. त्याचबरोबर शीख म्हणून त्यांना भारतात हातात कडं घालण्याची परवानगी मिळेल का? त्यांना गुरुद्वारात जाण्याची परवानगी मिळेल का? ही लढाई फक्त त्यांचीच नाही तर सर्वच धर्मांची आहे.