नवी दिल्ली : देशातील दूरसंचार कनेक्शनच्या विस्तारासाठी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी मोठी घोषणा केली आहे. २०२५ पर्यंत देशभरातील २५ हजार गावांना दूरसंचार जोडणी मिळेल.
देशात कनेक्टिव्हिटी नसलेली सर्वाधिक गावे ईशान्य भारतात असून ही संख्या सुमारे ६ हजार इतकी आहे, असेही केंद्रीय मंत्री सिंधिया यांनी सांगितले.
दरम्यान, केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी २०२५ च्या मध्यापर्यंत देशातील २५ हजार गावांमध्ये दूरसंचार आणि मोबाइल इंटरनेट सुविधा पुरवल्या जातील. आजही या भागात दूरसंचार सुविधा उपलब्ध नसून देशाच्या प्रत्येक क्षेत्रात संपूर्ण प्रवेश सुनिश्चित करणे हाच उद्देश आहे, केंद्रीय मंत्री सिंधिया म्हणाले.
ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशन(एआयएमए)च्या ५१व्या राष्ट्रीय व्यवस्थापन परिषदेत सिंधिया म्हणाले की, देशभरात एकूण ४ लाख ५० हजार टॉवर स्थापित केले गेले आहेत. परंतु काही गावे अद्याप जोडलेली नाहीत. आम्ही अंदाजे २० हजार टॉवर स्थापित करण्यासाठी या उपक्रमांतर्गत ४५ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. २०२५च्या मध्यापर्यंत उपक्रम पूर्ण होतील, असे सिंधिया म्हणाले.