रत्नागिरी : तालुक्यातील जयगड- खंडाळेश्वर मंदिरासमोरील तलावात पोहताना तालुक्यातील वाटद येथील 12 वर्षीय मुलगा बुडाल्याने अत्यवस्थ झाला. त्याला उपचारासाठी वादट-खंडाळा येथील पाथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. अभिषेक रमेश जंगम (12, रा. जंगमवाडी, वाटद, रत्नागिरी) असे मृत अल्पवयीन मुलाचे नाव आहे. ही घटना मंगळवारी 10 सप्टेंबर रोजी घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अभिषेक
मित्रांसोबत खंडाळेश्वर मंदिरासमोरील तलाव-खंडाळा येथे पोहण्यासाठी गेला होता. त्यावेळी तो पाण्यात बुडाल्याने त्याची प्रकृती अत्यवस्थ बनली होती. त्याला लगेच तलावाबाहेर काढून उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र वाटद खंडाळा येथे दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यानी त्याला तपासून मृत घोषित केले. जयगड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.