रत्नागिरी:-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळमधून
अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी रत्नागिरीतील तरुणाला कुडाळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी अल्पवयीन मुलीला पालकांच्या स्वाधीन केले आहे.
सविस्तर वृत्त असे की, कुडाळ
पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची फिर्याद मुलीच्या आई वडिलांनी केली. ही घटना 3 सप्टेंबर रोजी घडली होती. त्या मुलीने बाजारात जाऊन येते असे सांगुन निघून गेली होती ती परत आली नाही. याबाबत अल्पवयीन मुलीच्या पालकांनी तिचा शोध घेतला, परंतु ती मिळून आलेली नसल्याने व सदरची मुलगी तिचे मित्रासोबत गेली असावी असा संशय व्यक्त केला. त्याबाबत मुलीचे पालकांनी दिनांक ०९ सप्टेंबर रोजी कुडाळ पोलीस ठाणे येथे माहीती दिली.
तक्रारीवरून कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदुम यांनी तात्काळ दखल घेवुन अपहरण झालेल्या मुलीबाबत संशयीत आरोपीताबाबत गोपनीय व तांत्रीक विश्लेषणा आधारे माहीती काढली. त्यानंतर आरोपी व अपहरण झालेली अल्पवयीन मुलगी ही रत्नागिरी येथे असल्याची माहीती प्राप्त झाली. त्यानंतर कुडाळ पोलीसांनी रत्नागिरी पोलीसांना याबाबत माहीती देवुन आरोपीच्या ठावठिकाणाबाबत माहिती घेण्यास सांगितले. रत्नागिरीतील तरुणाने अपहरण केल्याचे पोलिसांना कळताच पोलिसांनी रत्नागिरी पोलिसांच्या मदतीने तरुणाला ताब्यात घेतले. अपहरण केलेल्या मुलीसह ताब्यात घेवुन तरुणावर संशयितांवर बीएसार कलम १३७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला, अशी माहिती कुडाळ पोलिसांनी दिली आहे.