सिंधुदूर्ग:-शिवसेना उबाठा प्रणित कामगार सेनेच्या कार्याने प्रेरित होऊन शिवसेना शिंदे गटाच्या सावंतवाडी आगाराच्या कर्मचाऱ्यांनी रविवारी कामगार सेनेत प्रवेश केला.
नियोजन सभागृहात नवनियुक्त जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी विभाग प्रमुखांची बैठक घेतली. यावेळी व्यासपीठावर प्रभारी अपर जिल्हाधिकारी पद्मश्री बैनाडे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे, श्रीमती देसाई, जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत बुधावले तसेच सर्व विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते. पाटील म्हणाले की, सामान्य माणसांच्या समस्या सोडविणे हे प्रशासनाचे प्रथम प्राधान्य आहे. प्रत्येक अधिकाऱ्यांनी सामान्य जनतेला नियमित भेटावे, त्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात. त्या समस्यांचे निराकरण करुन त्यांच्या अपेक्षा पुर्ण करणे हे प्रत्येक अधिकाऱ्यांचे कर्तव्य आहे. शासन राबवित असलेल्या विविध योजना आणि सेवांचा लाभ जिल्ह्यातील प्रत्येक पात्र लाभार्थ्यांना मिळण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.