दापोली:-शहरातील साने गुरुजी बालोद्यांना समोरील रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा स्थितीत गाडी उभी केल्याप्रकरणी मुकेश अंबालाल साळवी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दापोली खेड रस्त्यावर पुज्य साने गुरुजी बालोद्यान समोरील मुख्य रोडवर मुकेश साळवी याने महेंद्रा कंपनीची मॅक्झिमो गाडी उभी करून ठेवली होती. त्यामुळे रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण झाला होता.
सार्वजनिक रस्त्याने येणाऱ्या पादचाऱ्यांना देखील धोका निर्माण होईल अशी गाडी लावून साळवी कोठेतरी निघून
गेले होते. दापोली पोलीस स्थानकात भारतीय न्याय संहिता अधिनियम 2023 चे कलम 285 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास दापोली पोलीस करीत आहेत.