रत्नागिरी:-तालुक्यातील जयगड खाडीत बुडून तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सायंकाळी 6.30 च्या सुमारास घडली. शिवदयाल मनशाराम रायदास (26, रा.उत्तरप्रदेश, सध्या रत्नागिरी) असे मृताचे नाव आहे. या घटनेची नोंद जयगड पोलिसांत करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवदयाल हा 5 सप्टेंबर रोजी सायंकाळी जयगड खाडीमध्ये बोटीवर बसून दारु पित होता. यावेळी तोल जावून खाडीमध्ये पडल्याने त्याचा मृत्यू झाला, अशी नोंद पोलिसांत करण्यात आली आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.