रत्नागिरी : शहरातील मांडवी येथे चक्कर येवून बेशुद्ध पडल्याने महिलेचा मृत्यू झाल़ा. ही घटना शुक्रवारी रात्री 8 च्या सुमारास घडल़ी. सोनाली दीपक पिलणकर (53, ऱा मांडवी पिंपळवाडी) असे मृत महिलेचे नाव आह़े. या घटनेची नोंद रत्नागिरी शहर पोलिसात करण्यात आली आह़े.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनाली यांना 6 सप्टेंबर 2024 रोजी रात्री 8 च्या सुमारास चक्कर आल़ी. यामध्ये सोनाली या बेशुद्ध झाल्याने त्यांना उपचारासाठी प्रथम खासगी रुग्णालयात व नंतर जिल्हा शासकीय रुग्णालय येथे दाखल करण्यात आल़े. जिल्हा रुग्णालय येथे उपचार करण्यापूर्वीच सोनाली यांना तपासून मृत घोषित करण्यात आल़े.