रत्नागिरी : शहरालगतच्या नाचणे आदिनाथनगरसमोरील जंगलमय भागात गावठी दारु बाळगणाऱ्या संशयितावर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केल़ा. शुक्रवारी दुपारी 1.45 च्या सुमारास ही कारवाई करण्यात आल़ी. अभिषेक संदीप रणसे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आह़े. त्याच्या ताब्यातून पोलिसांनी 7 लिटर
गावठी दारु हस्तगत केल़ी.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाचणे आदिनाथनगरसमोरील जंगलमय भागात गावठी दारुची विक्री होत असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली होत़ी.
त्यानुसार पोलिसांनी 6 सप्टेंबर 2024 रोजी छापा टाकून कारवाई केल़ी. यावेळी संशयित आरोपीच्या ताब्यात पोलिसांना गावठी दारु आढळल़ी. या प्रकरणी पोलिसांनी संशयिताविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65 ई नुसार गुन्हा दाखल केल़ा.