गुहागर/उदय दणदणे:-गुहागर तालुक्यातील निवोशी ग्रामपंचायत महसूल क्षेत्रातील निवोशी दणदणे वाडी येथील स्ट्रीट लाईट जवळ जवळ पाच ते सहा महिने बंद असल्याने ऐन गणेशोत्सवात येथील नागरिकांना अंधारमय वातावरणात राहावे लागले, दणदणे वाडी परिसरात एकूण तीन स्ट्रीट लाईट आहेत त्यातील एक विजेवर तर दोन सौरऊर्जेवर चालणारे दिवे आहेत,यातील सौरऊर्जेवर चालणारे दिवे गेली अनेक वर्षे बंद आहेत,ग्रामपंचायतीला कळवूनही ते चालू होत नाहीत असे दणदणेवाडी ग्रामस्थांनी अधिक माहिती देताना सांगितले, ग्रामपंचायत सदस्य यांना कळविलेले असूनही येथे दुर्लक्ष झाल्याचे ग्रामस्थ सांगतात.
गेली अनेक वर्षे येथील पुढारी, लोकप्रतिनिधी यांचे दणदणेवाडीच्या विविध विकास कामांकडे दुर्लक्ष होत असल्याचे येथील सामाजिक कार्यकर्ता तसेच पत्रकार उदय दणदणे यांनी प्रसार माध्यमाना माहिती देताना सांगितले, लवकरात लवकर याठिकाणी ह्या बंद स्ट्रीट लाईट चालू व्हाव्यात असे येथील नागरिक अपेक्षा व्यक्त करत आहेत.