रत्नागिरी:-सिंधुदुर्ग पाठोपाठ रत्नागिरीत खळबळ उडवणारी घटना घडली आहे. रत्नागिरी मारुती मंदिर येथील शिवसृष्टी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या ४ मावळ्यांची तोडफोड करण्यात आली आहे. नुकताच हा प्रकार समोर आला आहे. सकाळी पहाटे हा प्रकार समोर आल्यानंतर लोकांच्या भावनांचा विचार करून मावळे प्लास्टिकने झाकून ठेवण्यात आले.या प्रकाराने रत्नागिरीत आगडोंब उसळण्याची शक्यता आहे.
सिंधुदुर्ग येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची दुर्घटना समोर आली आहे. या प्रकाराने राज्यात संपाताची लाट पसरलेली असताना आता रत्नागिरीत मारुती मंदिर येथे मध्यवर्ती ठिकाणी शहराचे सौंदर्य वाढवण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण कायम राहावी यासाठी आणि पर्यटकांचा ओढा वाढावा यासाठी शिवसृष्टी तयार करण्यात आली होती. मात्र सोमवारी सकाळी येथे दुर्घटना पाहायला मिळाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचे हातीतील कडे कुणीतरी अज्ञाताने तोडण्याचे समोर आले आहे. तसेच एक दोन मावळ्यांचीही तोडफोड झाल्याचे दिसून येत आहे. या प्रकाराने शिव प्रेमींकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे. ही घटना कळताच शिव प्रेमी मारुती मंदिर परिसरात जमा झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार काही शिवप्रेमी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी दाखल झाल्याची माहिती मिळत आहे.