मालवणमधून परस्पर पुढील दौऱ्याला रवाना
कुडाळमध्ये होता कडेकोट पोलीस बंदोबस्त
सिंधुदूर्ग:-मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज सकाळी मालवण राजकोट येथे जाऊन कडेकोट पोलीस बंदोबस्तात छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोसळलेल्या पुतळ्याची पाहणी केली.
त्यांनतर ते कुडाळमध्ये मराठा समाज मेळाव्याला उपस्थित राहणार असा त्याचा दौरा कार्यक्रम होता. कुडाळच्या मराठा समाज हॉल मध्ये हा मेळावा होणार होता. पण पुढे नियोजित कार्यक्रम असल्याने जरांगे पाटील मालवणहून कसालमार्गे पुढील नियोजित कार्यक्रमाला रवाना झाले. त्यामुळे त्यांचे विचार ऐकण्यासाठी जमलेल्या मोजक्याच नागरिकांचा मात्र हिरमोड झाला.
मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज सकाळी मालवण राजकोट येथे जाऊन कडेकोट पोलीस बंदोबस्तात छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोसळलेल्या पुतळ्याची पाहणी केली. त्यांनतर ते कुडाळमध्ये मराठा समाज मेळाव्याला उपस्थित राहणार असा त्याचा दौरा कार्यक्रम होता. कुडाळच्या मराठा समाज हॉल मध्ये हा मेळावा होणार होता. सध्या राज्यातील एक प्रभावी नेतृत्व म्हणून जरांगे पाटील यांच्याकडे बघितले जाते. त्यामुळे त्यांच्या या मेळाव्याला गर्दी होणार,असा अंदाज असल्याने आणि मनोज जरांगे पाटील पहिल्यांदाच सिंधुदुर्गात येत असल्याने, तो सगळा अंदाज बांधून पोलीस प्रशासनाने कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला होता. पोलिसांची अतिरिक्त कुमक देखील मागविण्यात आली होती. मराठा हॉलच्या आजूबाजूला पोलिसच पोलीस उभे असलेले दिसत होते. त्याच बरोबर ज्या नेरूरपार मालवण मार्गाने जरांगे पाटील कुडाळ मध्ये दाखल होणार होते त्या मार्गात देखील पोलीस तैनात होते. कुडाळच्या पोताजवळच्या नाक्यावर देखील पोलीस बंदोबस्त होता.
मराठा समाजाच्या हॉल बाहेर मराठा समाजाचा भगवा फडकत होता. १० वाजून गेले. ११ वाजले तरी मनोज जरांगे पाटील आले नव्हते. कोणतीतरी सांगितले कि आता ते पाहणी करून मालवण वरून निघाले आहेत. त्यामुळे पत्रकार सुद्धा मराठा हॉल मध्ये पोहोचले होते. हॉल मध्ये तशी माणसांची गर्दी नव्हती. पण नंतर माणसे येतील असे आयोजकांना वाटले होते. पण आयोजकांनी थोड्यावेळाने जाहीर केले कि मनोज जरांगे पाटील यांची मालवण मध्ये पत्रकार परिषद झाली आहे. आणि त्यांना लवकर पुढील मुक्कामी पोहोचायचे असल्याने ते मालवणवरून परस्पर कसालमार्गे पुढे रवाना झाले आहेत. हि घोषणा ऐकल्यावर सर्वजण हॉल बाहेर पडले. जरांगे पाटील यांचे विचार ऐकण्यासाठी आलेल्या मोजक्याच नागरिकांचा मात्र हिरमोड झाला. याबाबत नंतर उलटसुलट प्रतिक्रिया मात्र उमटत राहिल्या. जरांगे पाटील यांनी काही वेळासाठी तरी कुडाळ मध्ये येऊन जायला पाहिजे होते असेच साऱ्यांना वाटू लागले आणि आता नेक्स्ट टाइम म्हणत सर्वानी मराठा सभागृह सोडले.