रत्नागिरी:-रत्नागिरी शहराजवळील शिरगाव येथे एका महिलेच्या पती व मुलीला मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणी समिया मेहताब साखरकर (40, रा. शिरगांव रत्नागिरी) यांनी शहर पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी 7 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
समिया यांचे पती मेहताब व मुलगी मुस्कार यांना सातजणांनी मारहाण केल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे. आशिरीन एजाज नाखवा, एजाज नाखवा, इम्रान नाखवा, खैरुन नाखवा, आतिफा इम्रान नाखवा, आफिन एजाज नाखवा, अरसलान एजाज नाखवा (रा.सर्व शिरगांव नाखवा मोहल्ला, रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समिया साखरकर व संशयित आरोपी यांच्यात 31 ऑगस्ट रोजी दुपारी 1.30 च्या सुमारास किरकोळ कारणातून वाद झाला होता. या वादातून संशयित आरोपींनी समिया नाखवा यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांचे पती मेहताब व मुलगी मुस्कान ही मध्ये सोडवायला आली असता त्यांनाही संशयित आरोपींनी मारहाण केली, अशी तक्रार समिया यांनी शहर पोलिसांत दिली. पोलिसांनी या प्रकरणी संशयितांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कायदा कलम 324(5)(4), 191(2), 190,189(2), 118(1), 115(2) नुसार गुन्हा दाखल केला.