खेड:-खेडमध्ये खाडीपट्ट्यात केल्या जाणाऱ्या वाळू उत्खनना साठा कर्जी येथील एका प्लॉटवर केला जात आहे. 3 संक्शन पंपाच्या सहाय्याने केल्या जाणाऱ्या वाळू उत्खननामुळे मासेमारी धोक्यात आली आहे. आठवडाभरापूर्वा जाधव नामक मच्छिमारीच्या बोटीचे मोठे नुकसान झाले होते. संक्शन पंपाद्वारे केल्या जाणाऱ्या वाळू उत्खननामुळे मासेमारीसाठी वापरण्यात येणारे जाळेही तुटत आहेत. बेकायदेशीरपणे उत्खनन केलेल्या वाळूची खेड, दापोली, मंडणगड तालुक्यात बिनधोक वाहतूक केली जात असल्याचे समोर आले आहे.
खाडीपट्ट्यातील रस्त्याची आधीच दयनीय अवस्था झाली आहे. त्यात वाळू वाहतुकीच्या वाहनांमुळे मार्ग बिकट बनली आहे. विशेषत: कोरेगाव, संगलट रस्त्यी डम्परद्वारे होणाऱ्या वाळू वाहतुकीमुळे चाळण झाली आहे. खाडीपट्ट्यात ऐन पावसाळ्यात राजरोसपणे वाळू उत्खनन सुरू असतानाही महसूल विभागाने हाताची घडी अन् तोंडावर बोट ठेवल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.