चिपळूण:-गुहागर कराड मार्गावर काविळतली येथे कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीचा मागील सीटवर बसलेली तरुणी जखमी झाल्याची घटना चार दिवसांपूर्वी घडली. या प्रकरणी शानिवारी त्या कार चालकावर चिपळूण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समीर सुरेश खेडेकर (39, काविळतळी) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.
पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, 28 रोजी सायंकाळी 4 च्या सुमारास श्रेयश समीर कमालकर हे त्यांच्या ताब्यातील दुचाकीच्या पाठीमागे अक्षया अनिल नरळकर (24, काविळतळी) यांना बसवून ते चिपळूण बाजारपेठ ते काविळतळी अशी गुहागर-कराड रस्त्याने जात होते. ते शहरातील काविळतळी येथे ट्रेडस मॉलच्या बाजूच्या गल्लीतून समीर खेडेकर हा कार चालक दारुच्या नशेत, तसेच रस्त्याच्या विशिष्ठ परिस्थितीकडे लक्षात न घेता भरधाव वेगात आणून दुचाकीला धडक दिली. यात अक्षया नरळकर ही जखमी झाली. या अपघातापकरणी समीर खेडेकर याच्यावर गुन्हा दाखल झाला.