दापोली:-रिक्षाची धडक बसून जखमी अवस्थेत सापडून आलेल्या बिबट्याच्या पिल्लाला नुकतेच जीवदान देण्यात आले.
वाकवली वसतिगृह येथे माळरानावर गिरीधर येलकर यांनी बिबट्याच्या पिल्लाला रिक्षा धडक बसल्याची माहिती मिलिंद गोरीवले यांना दिली. त्यांनी तत्काळ जागेवर जाऊन वाईल्ड ऍनिमल रेस्क्यू टिमने पाहणी केली असता बिबट्याचे पिल्लू जखमी अवस्थेत रस्त्याच्या बाजूला बसून असल्याचे निदर्शनास आल्यानंतर दापोली परिक्षेत्र वनाधिकारी प्रकाश पाटील यांना कळवले.
या नंतर या पिल्लाला सुरक्षित ताब्यात घेऊन शासकीय वाहनातून पशुवैद्यकीय अधिकारी, दापोली यांच्याकडे उपारासाठी नेण्यात आले. उपार झाल्यानंतर पुढील उपचारासाठी या बिबट्याच्या पिल्लास पुणे येथे पाठवण्यात आले. ही कारवाई परिक्षेत्र वनाधिकारी प्रकाश पाटील, वनपाल एस. एस. सावंत, वनरक्षक गणपत जळणे, वनरक्षक सुरज जगताप, वनरक्षक शुभांगी गुरव, वनरक्षक शुभांगी भिलारे व वाईल्ड ऍनिमल रेस्क्यू टीमो तुषार महाडिक, मिलिंद गोरीवले, मयूर चव्हाण, अनिकेत जाधव यांनी केली.