जिल्हा रुग्णालयातील घटना
रत्नागिरी : जिल्हा रुग्णालयात चाललय तरी काय? दोन दिवसांपूर्वीच डॉक्टरने जिल्हा रुग्णालयात दारू पिऊन येऊन रुग्णांना तपासल्याचा व्हिडिओ व्हायरल होत असताना आता नवीन प्रकरण पुढे आले आहे. जिल्हा रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याने दारू पिऊन येऊन डॉक्टरांसमोर धिंगाणा घातल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरानंतर त्या कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिलिंद मधुकर चव्हाण (53, ऱा मुरुगवाडा रत्नागिरी) असे या कर्मचाऱ्याचे नाव आह़े. पोलिसांनी मिलिंद यांच्याविरुद्ध शासकीय कार्य बजावत असताना दारु पिणे व धिंगाणा घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल केल़ा.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मिलिंद चव्हाण हा जिल्हा शासकीय रुग्णालय येथे चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून काम करत़ो. 31 ऑगस्ट रोजी सकाळी 9.30 जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर विनोद सांगविकर हे रुग्णांच्या तपासणीसाठी सर्जिकल वार्डमध्ये गेले होत़े. यावेळी रुग्णालयाचा कर्मचारी मिलिंद चव्हाण हा ड्युटीवर असताना दारुच्या नशेत असल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आल़े. ड़ॉ. सांगविकर यांनी याबाबत चव्हाण याला जाब विचारल़ा. आपल्याला विचारणा केल्याचा राग आल्याने मिलिंद याने ड़ॉ. सांगविकर यांच्याशी उद्धटपणे वागून अरेरावीची भाषा वापरू लागला. यावेळी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी मिलिंद याला समजविण्याचा प्रयत्न केल़ा असता मिलिंद हा कुणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हत़ा.
कामावर असताना मिलिंद हा दारुच्या नशेत असल्याने त्याच्या वैद्यकीय तपासणी करण्यात आल़ी. याप्रकरणी रुग्णालयाचे सुरक्षा रक्षक परेश मयेकर (ऱा शिरगांव मयेकरवाडी रत्नागिरी) यांनी शहर पोलिसांत मिलिंद याच्याविरुद्ध तक्रार दाखल केल़ी. त्यानुसार पोलिसांनी मिलिंद चव्हाण याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम 117,110 तर महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 85 (1)(2) नुसार गुन्हा दाखल केल़ा.