जिल्हा रुग्णालयातील प्रकार
रत्नागिरी : या ना त्या कारणाने जिल्हा शासकीय रुग्णालय चर्चेत राहिले आहे. नुकताच जिल्हा रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. ड्युटीवरील डॉक्टर चक्क दारू पिऊन रुग्णांची तपासणी करत असल्याचा व्हिडिओ सद्या व्हायरल होतं आहे. या प्रकाराने आश्चर्य व्यक्त होत आहे दारू पिऊन ड्युटीवर हजर राहणाऱ्या या डॉक्टर विरोधात शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. एवढेच नव्हे जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडून संबंधित डॉक्टराकडून खुलासा मागवण्यात आला आहे.
जिल्हा रुग्णालयात हजर होण्यापूर्वीही संबंधित डॉक्टर देवरुख ग्रामीण रुग्णालयात कार्यरत होते, मात्र तेथेही त्यांच्याविरोधात तक्रारी आहेत. असे असताना जिल्हा शासकीय रुग्णालयात आल्यानंतरही त्यांचे प्रकार थांबले नाहीत. या डॉक्टरसोबतच अन्य काही डॉक्टरही मद्यधुंद अवस्थेत रुग्णालयात वावरत असल्याचेही बोलले जात आहे.