खेड : अल्पवयीन मुलीचे फोटो मॉर्प करून धमकी देत शरीरसुखाची मागणी केल्याप्रकरणी येथील पोलिसांनी अटक केलेल्या जगदीश मारूती गोटल (28 रा. गुणदे-गोटलवाडी) यास न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
पीडित अल्पवयीन युवतीचे बनावट इंस्टाग्राम आयडी तयार करून तो मॉर्प केलेले अश्लिल फोटो अपलोड करत तिच्या व्हॉटस्ऍप क्रमांकावर अनोळखी व्हॉटस्ऍप क्रमांकावरून पाठवत धमकी देवून शरीरसुखाची मागणी केली होती. या बाबत पीडित अल्पवयीन मुलीने पोलीस स्थानकात तक्रार दाखल केल्यानंतर पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांनी तपासाला गती देत जगदीश गोटल याच्या मुसक्या आवळल्या होत्या.