संतप्त जमावाने धारेवर धरत पोलिसांच्या केले स्वाधीन
संगमेश्वर:-संगमेश्वर तालुक्यातील वांद्री येथे शाळकरी मुलींशी शिक्षकाचे अश्लील चाळे करणाऱ्या शिक्षकाला ग्रामस्थांनी जाब विचारत पोलिसांच्या ताब्यात दिले. ही घटना आज शुक्रवार 30 ऑगस्ट रोजी उघडकीस आली.
सविस्तर वृत्त असे की, वांद्री येथील प्राथमिक शाळेत पाचवी,सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनींसोबत शिक्षक हा अश्लील चाळे करायचा. पाचवी, सहावीतील मुलींशी तो अश्लील कृत्य करत होता. शेवटी कंटाळून या मुलींनी घरी सारा प्रकार सांगितला.
संतप्त झालेल्या पालकांनी शुक्रवारी तातडीची पालक सभा लावली. आणि संतप्त झालेल्या पालकांनी शिक्षकाला जाब विचारण्यास सुरूवात केली. ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार हि बातमी वाऱ्यासारखी पसरताच अन्य ग्रामस्थांनी सायंकाळी शाळेवर धडक दिली. शिक्षकाला जाब विचारला. वातावरण चिघळताच पोलिसांना याची माहिती देण्यात आली. प्रकरण गंभीर असल्याने डिवायएसपीसह अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जमावाला शांत करत शिक्षकाला ताब्यात घेतले. संगमेश्वर पोलिसांनी त्याला ताब्यात घेत पुढील कार्यवाहीसाठी संगमेश्वर पोलीस स्थानकात नेण्यात आले आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.