संगमेश्वर : तालुक्यातील वांद्री येथे झाडीझुडूपाच्या आ़डोशाला हातभट्टीची अवैध दारु विकणाऱ्या एकावर संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गजानन शंकर किर (रा. वांद्री, ता. संगमेश्वर) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना बुधवारी 28 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास गिराचा पऱ्या वांद्री येथे घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किर हा विनापरवाना हातभट्टीची ९५० रुपयांची ९ लिटर दारु विक्रीसाठी ठेवलेल्या स्थितीत पोलिसांच्या निदर्शनास आला. या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल राहूल खरपे यांनी संगमेश्वर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.