रत्नागिरी : शहरालगतच्या भाटये खाडीकिनारी पुलाखाली तरुणाचा मृतदेह आढळून आल़ा ही घटना गुरुवारी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आल़ी मृताचे वय अदांज 45 असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आह़े मृताची अद्याप ओळख पटली नसून पोलिसांनी यापकरणी पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयाकडे पाठविल़ा.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भाटये येथे पुलाखाली 29 ऑगस्ट रोजी सायंकाळी मृतदेह आढळून आल़ा या घटनेची खबर तातडीने रत्नागिरी शहर पोलिसांना देण्यात आल़ी त्यानुसार पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाल़े स्थानिकांकडे मृताची ओळख पटविण्याचे काम पोलिसांकडून सुरु करण्यात आले असता त्याची ओळख समजून आलेली नाह़ी यापकरणी पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आह़े