चंपक मैदान तरुणी अत्याचार प्रकरण
रत्नागिरी : शहरालगतच्या चंपक मैदान येथे तरुणीवर झालेल्या अत्याचार झाल्याच्या घटनेने जिल्ह्यात संतापाची लाट उसळली होती. यावेळी संतप्त झालेल्या लोकांनी जिल्हा रुग्णालयावर मोर्चा काढला होता. पोलिसांनी आक्रमक मोर्चेकऱ्यांना दोन दिवसांची मुदत द्या आरोपीला आम्ही ताब्यात घेऊ असे सांगितले होते. मात्र दोन दिवस उलटूनही पोलिसांना आरोपीला पकडण्यात अपयश आलं आहे. मात्र पोलिसांकडून आतापर्यंत पाचजणांची चौकशी करण्यात आली आहे. मंगळवारी तिघांना ताब्यात घेतले होते. तर बुधवारी आणखी दोघांची चौकशी करण्यात आल्याचे सांगण्यात आले. असे असले तरी कोणताही ठोस पुरावा पोलिसांच्या हाती लागला नसल्याची माहिती समोर येत आह़े.
नर्सिंगचे शिक्षण घेत असलेल्या तरुणीवर शहरानजीकच्या चंपक मैदान येथे 26 ऑगस्ट रोजी सकाळी अत्याचार झाल्याचे समोर आले होत़े. या घटनेनंतर रत्नागिरी शहरात संतापाची लाट उसळली होत़ी परिचारिका संघटनांबरोबरच विविध सामाजिक संघटनांकडून आदोलने, निदर्शने करण्यात आल़ी. यावेळी आंदोलनकर्त्यांनी आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांना दोन दिवसांची मुदत दिली होत़ी. यावेळी पोलिसांकडून आम्हाला पुरेसा वेळ द्या, आम्ही आरोपीला सोडणार नाही, अशी हमी दिली होत़ी. पोलिसांकडून या प्रकरणी कसून तपास केला जात असताना आरोपीला अटक करण्यात आलेली नाह़ी. या तपासासाठी एस आय टी पथक ही तयार करण्यात आले आहे. पीडितेने दिलेल्या जबाबानुसार रिक्षामध्ये बसल्यानंतर रिक्षाचालकाने तिला पाणी पिण्यास दिल़े. यानंतर ती बेशुद्ध पडल़ी. दरम्यान पोलिसानी रिक्षाचालकाचा शोध घेण्यासाठी शहरातील विविध मार्गावरील खासगी सीसीटीव्ही तपासण्यास सुरुवात केली आह़े. पोलिसांकडून गुह्यांचा तपास करताना अधिक माहितीसाठी पीडितेच्या मित्र, मैत्रिणींकडेही चौकशी केली जात आह़े. मात्र आरोपीबाबत कोणतीही ठोस माहिती पोलिसांच्या हाती लागू शकली नाह़ी.