दापोली : मोबाईल दुकानात काम करणाऱ्या मुलीला आपण विवाहीत असल्याचे लपवून लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार करून फास्वल्याप्रकरनी तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला. वीस वर्षीय तरुणीवर मुंबई व दिल्ली येथे नेऊन अत्याचार करून तिला वाऱ्यावर सोडून देणाऱ्या विवाहीत तरुणाला अटक करण्यात आली आहे. सागर सुरेश जाधव (नवशी दापोली) असे याला गजाआड करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.
शहरातील एका मोबाईलच्या दुकानात सागर जाधव व पीडित तरूणी कामाला होती. सागर जाधव हा एका मोबाईल कंपनीचा प्रमोटर म्हणून काम करत होता. मात्र त्याचे आर्थिक व्यवहार संशयास्पद वाटल्यामुळे सहा महिन्यांपूर्वी त्याला मोबाईलच्या दुकान मालकाने कामावरून कमी केले होते.
दापोलीतील एका श्रीमंत मित्राचे क्रेडिट कार्ड वापरून सागर याने अनेक मोबाईलदेखील खरेदी केले होते. त्याची त्याने परस्पर विक्रीदेखील केली होती. मात्र त्या मित्राला त्याने पैसे परत केले नाहीत. यामुळे त्याच्या मित्राला 33 हजार रुपयांचा दंड देखील बँकेत भरावा लागला. त्याने ज्यांना-ज्यांना मोबाईल जास्त भावाने विकले ते आता एकत्र येऊन त्याच्याविरुद्ध दापोली पोलीस स्थानकात तक्रार दाखल करणार असल्याची माहिती देखील उपलब्ध झाली आहे.
वास्तविक एका दुकानात एकत्र काम करतानाही या तरुणीला सागर हा विवाहित असल्याची माहिती नव्हती. यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात आले येत आहे. सागर जाधवने फोन करण्याकरिता तिचा मोबाईल मागून घेतला व तिच्या मोबाईल वरून तिचे फोटो आपल्या मोबाईलमध्ये घेतले. त्याने ते फोटो ‘मॉर्प’ करून तिचे अश्लील फोटो बनवले व तिला या आधारे तो ब्लॅकमेल करत होता. अखेर ब्लॅकमेलला कंटाळून व घरच्यांच्या जीवाला सागर काही बरं वाईट करेल अशी भीती वाटल्याने ही युवती त्याच्याबरोबर पळून जायला राजी झाली. ते पळून गेले त्याच दिवशी दोन तासात सागरने त्या मुलीला तिच्या घरी आईला फोन करून मी लग्न केले आहे एवढेच बोलण्याची अनुमती दिली होती. यानंतर ते मुंबईला पळून गेले.
लोकेशन समजू नये याकरिता ते मुंबई ते दिल्ली, दिल्ली ते मुंबई पुन्हा मुंबई ते दिल्ली असा चार दिवस प्रवास करत होते. यामुळे पोलिसांना त्यांचे लोकेशन तपासणे कठीण बनले होते. मात्र सागर बुधवारी सकाळी अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडला. जाधव यांने आपण विवाहित असताना देखील तरुणीची फसवून केली. तिच्याशी लग्न करत तिचा उपभोग घेऊन वाऱ्यावर सोडून दिले हे स्पष्ट केले आहे.
या प्रकाराने संतापाची लाट पसरली होती. सागर याच्यावर कडक कारवाई व्हावी. अशी सर्व स्तरातून मागणी होत आहे. दापोली पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.