दापोली : तालुक्यातील जालगाव- कुंभारवाडी येथील घराला सोमवारी सकाळी आग लागून घराचे नुकसान झाले.
जलस्वराज्य ग्रामपंचायत जालगाव हद्दीतील कुंभारवाडी येथील रहिवासी प्रियांका वायकर यांच्या घराला अचानक आग लागली. आगीमुळे घराचे तसेच आतील साहित्याचे नुकसान झाले आहे. सरपंच अक्षय फाटक यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य घटनास्थळी उपस्थित होते. संबंधित अधिकाऱ्यांनी घटनेचा पंचनामा करून जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळावी अशा सूचना सरपंचांनी दिल्या आहेत. यावेळी कुंभारवाडा येथील ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी उपस्थित होते.