..तर आरोपीला दोन तासात पकडता आले असते : राजन साळवी
रत्नागिरी:-रत्नागिरी चंपक मैदान येथे परीचारीकेवर बलात्कार प्रकरणाने रत्नागिरी जिल्हा हादरला आहे. हा प्रकार कळताच आमदार राजन साळवी जिल्हा रुग्णालयात दाखल झाले. त्यांनी हा प्रकार निंदनीय असल्याचे म्हंटले आहे. साळवी स्टॉप परिसरातील सीसीटिव्ही बंद असल्याची बाब आमदार राजन साळवी यांनी उघड केली. यावेळी आमदार राजन आक्रमक झाले होते. पीडितेला न्याय मिळण्यासाठी आपण सर्वांनी तिच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. असे म्हणत पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आरोप केला आहे. साळवी स्टॉप व इतर परिसरातील सीसीटिव्ही बंद असल्यामुळे आरोपीला पकडणे कठीण झाले आहे.हेच सीसीटिव्ही जर चालू असते तर आरोपींना दोन तासात अटक करता आली असती. परंतु पोलीस आणि सीसीटिव्ही निरीक्षक यांच्या दुर्लक्षामुळे असा प्रकार घडला आहे. सीसीटिव्ही पाहणी जे करतात त्यांना आधी निलंबित केले पाहिजे असा आक्रमक पवित्रा राजन साळवी यांनी घेतला. यावेळी आक्रमक झालेल्या नागरिकांनी चक्क रस्त्यांवर ठण मांडले.राज्यातील घटनेनंतर आता रत्नागिरीत अशा प्रकारच्या घटना घडत असतील तर ते निंदनीय आहे. आरोपींना लवकरात लवकर पोलिसांनी पकडले पाहिजे. पोलिसांनी दोन दिवस आरोपीला पकडण्यासाठी मुदत मुदत मागितली असली तरी त्यांच्या निष्काळजीपणामुळे आरोपीला पकडण्यात अडचणी येत आहेत. आज सीसीटिव्ही चालू असते तर आरोपीला दोन तासात पकडता आले असते असे राजन साळवी म्हणाले..