खेड : कोकण मार्गावर रेल्वेगाड्यांतून प्रवास करणाऱ्या महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावण्याचे सत्र सुरूच आहे. कळंबणीनजीकही धावत्या रेल्वेगाडीतून महिलेचे 2 तोळे वजनाचे मंगळसूत्र चोरट्याने हिसकावत पलायन केल्याची घटना शुक्रवार 23 ऑगस्ट रोजी सायंकाळी 8.20 च्या सुमारास घडली.
कोकण मार्गावर धावणाऱ्या 12619 क्रमांकाच्या मत्स्यगंधा एक्सप्रेसमधून प्रज्ञा प्रकाश कोटवाडेकर या एस-5 डब्यातील 51 क्रमांकाच्या आसनावरून प्रवास करत होता. त्या खिडकीजवळ बसलेल्या असताना चोरट्याने त्यांच्या गळ्यातून 2 तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावत पोबारा केला. या घटनेनंतर रेल्वेच्या आपत्कालीन स्थितीतील साखळी खेचण्यात आल्याचे समजते. या बाबतची अधिक माहिती उपलब्ध होवू शकली नाही.