रत्नागिरी : तालुक्यातील पाली पाथरट मावळवतवाडी येथील बिबट्याचा मृत्यू दुषित पाणी प्यायल्यामुळे फुफ्फुसाचा गंभीर आजार होऊन झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवालानंतर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यानी स्पष्ट केले असल्याचे वनविभागाच्यावतीने सांगण्यात आले.
त्या मृत बिबट्याला जाळून नष्ट करण्यात आल्याचे रत्नागिरी परिक्षेत्र वन अधिकारी प्रकाश सुतार यांनी सांगितले. त्या मृत बिबट्याचा व्हिसेरा काढण्यात आला असून तो तपासणीसाठी प्रयोग शाळेत पाठविण्यात आला आहे. अहवाल आल्यानंतर बिबट्याच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. लवकरच त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर बिबट्याच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.