दापोली : शहरातील मेहता पेट्रोल पंपासमोर भाजीच्या दुकानाजवळ दारू प्राशन करून गोंधळ घातल्याप्रकरणी रत्नदीप सुरेश कासारे (36, रा. सडवे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 21 ऑगस्ट रोजी संध्या. 6:45 च्या सुमारास मेहता पेट्रोल पंपासमोरील भाजी दुकानात रत्नदीप कासारे हा दारूच्या नशेत मोठमोठ्याने आरडाओरड करत हातवारे करून शांततेचा भंग करीत असताना आढळून आला. याप्रकरणी दापोली पोलिसांनी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 कलम 85 (1)(2) व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 110, 117 प्रमाणे त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.