सिंधुदुर्ग:-अरबी समुद्रात वादळ सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे २४ ऑगस्टपर्यंत मच्छीमारांनी खोल समुद्रात जाऊ नये,असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर गुजरात डहाणूसह शेकडो नौका देवगड बंदरात दाखल झाल्या आहेत.
दरम्यान नारळी पौर्णिमेनंतर समुद्रातील मच्छीमारीला खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली असताना वादळ सदृश्य वातावरण तयार झाल्यामुळे मच्छीमारांचे मोठे नुकसान होण्याची भिती व्यक्त होत आहे.