तुषार पाचलकर / राजापूर
नुकत्याच झालेल्या बदलापूर व कोल्हापूर येथील निंदनीय घटनेच्या निषेधार्थ उद्या राजापूर तालुक्यातील मोठी पाचल बाजारपेठ सायं. 5 वाजे. बंद ठेवण्याचा निर्णय आज झालेल्या व्यापारी संघटना पाचल यांनी आयोजित केलेल्या श्री महागणपती मंदिर येथील सभेत झाला. अशी माहिती पाचल व्यापारी संघटनेचे अध्यक्ष आण्णा पाथरे यांनी दिली.
यावेळी बोलताना विषय खूप संवेदनशील असल्याने पाचल मधील इतर काही संघटना आहेत उदा. बार असोसिएशन.. डॉक्टर्स.. रिक्षा चालक मालक संघटना यांनी देखील घटनेचे संवेदनशीलता ओळखून उद्याच्या बंद ला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले
या विषयाचे गांभीर्य ओळखून पाचल रिक्षा चालक मालक सबघटनेचे अध्यक्ष जयंत धावडे यांनी उद्याच्या बंद मध्ये सामील होणार असल्याची माहिती दिली..
सभेच्या दरम्यान सर्व व्यापारी आणि ग्रामस्थांना पाचल व्यापारी संघटनेच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे कि सदर घटनेच्या निषेधार्थ पाचल व परिसरातील नागरिकांनी सकाळी 9 वाजता पाचल बस स्थानक येथे घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन ही यावेळी करण्यात आले.