गुहागर : तालुक्यातील पांगारीतर्फे वेळंब आडीचा डोह नदी किनारी येथीलच 40 वर्षीय इसम मयत स्थितीत मिळून आला आहे.
दिलीप महादेव भुवड, (40, रा. पांगारीतर्फे वेळंब) असे मृताचे नाव आहे. 21 ऑगस्ट 2024 रोजी तो पांगारीतर्फे वेळंब येथील आडीचा डोह येथे मासे पकडण्याकरीता गेला असताना सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास नदीच्या पात्रातील पाण्यालगत मयत स्थितीत मिळून आला. पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.