रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यातील कोंड्ये गावचे गावकर आणि येथील ग्रामपंचायतीचे माजी सदस्य गंगाराम कृष्णा शितप यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. निधनासमयी त्यांचे वय 98 वर्षे होते. त्यांच्या जाण्याचे गावात हळहळ व्यक्त होत आहे
गंगाराम शितप यांनी गावकी, भावकीमध्ये त्यांना पचंड मान होता. गावामध्ये कोणत्याही पकारचे वाद विवाद होणार नाहीत यासाठी त्यांचा वचक असायचा. गावातील मुलांना नमन व इतर कार्यकमात समजावून घेऊन सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची त्यांची वृत्ती होती. यामुळे ते गावातील सर्वांचे आदराचे स्थान होते. त्यांच्या निधनाने गावातील एक जाणकार आणि मनमिळावू गावकर हरपल्याने दुःख होत आहे. त्यांच्या अंत्ययात्रेला कोंडये गाव व इतर गावातील मंडळी, त्यांना मानणारे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांच्या पश्चात 3 मुलगे, 1 मुलगी, 1 पुतण्या सुना, नातू, पणतू असा परिवार आहे.