चिपळूण :चिपळूण तालुक्यातील केंद्रीय शाळा गोवळकोट उर्दू च्या केंद्र मुख्याध्यापिका रेहाना वलेले मॅडम यांच्या वयोमानानुसार सेवानिवृत्ती निमित्त चिपळूण तालुक्यातील उर्दू माध्यमातील सर्व शिक्षकांनी त्यांना भावपूर्ण निरोप दिला.
रेहाना वलेले यांचे मंडणगड आणि दापोली तालुक्यात उत्तम शैक्षणिक कार्य करुन त्यांचे आगमन चिपळूण तालुक्यात झाले होते.त्या अत्यंत मनमिळाऊ , कार्यकुशल, सेवाभावी शिक्षिका असून त्यांचे शैक्षणिक कार्य ही उत्तम असून चिपळूण तालुक्यात ही त्यांनी मोलाचे योगदान दिले असल्याने त्यांना तालुक्याच्या वतीने भावपूर्ण निरोप देण्यात आला. त्यांच्या चाहत्यांकडून त्यांना भेटवस्तू देऊन आणि पुढील भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या वेळी तालुक्यातील गोवळकोट उर्दू केंद्राचे केंद्रीय प्रमुख अशफाक पाते सर, गट समन्वयक शौकत कारविणकर, ज्येष्ठ शिक्षक एजाज इब्जी तसेच तालुक्यातील उर्दू माध्यमाचे सर्व शिक्षक ,पालक , आजी माजी विद्यार्थी, नातेवाईक तसेच ग्रामस्थ बहू संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे यशस्वी सूत्रसंचालन जियाऊल्ला खान यांनी केले. उपस्थितांचे अ. कादिर तांबे यांनी मन:पूर्वक आभार मानले.