संगमेश्वर:-तालुक्यातील चिखली येथे एका मादीची बिबट्याची पिल्ले सापडली. याबाबतची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी दाखल झाले. मादीची पिल्ल 15-20 दिवसांची असल्याने मादी याच परिसरात राहत असणार त्यामुळे येथील नागरिकांनाही धोका संभवतो. वनविभागाने शोध मोहीम राबवत या मादीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्या परिसरात सोडण्यात आले.
सविस्तर वृत्त असे की, चिखली येथे एका बंद शेड आहे. या परिसरात 18 ऑगस्ट रोजी दोन स्थानिक नागरिक दुपरच्या सुमारास कामासाठी गेले होते. यावेळी एका बंद शी जवळ त्यांना पिल्लांच्या ओरडण्याचा आवाज आला. त्यांनी आवाजाच्या दिशेने जाऊन पाहणी केली असता तीन बिबट्याची पिल्ले दिसून आली. या परिसरात कोणाचाही तितकासा वावर नसल्यामुळे मादीने आपल्या पिल्लांना या सुरक्षित जागी आणले असावे असा अंदाज व्यक्त करण्यात आला. त्यांनी लगेचच वनविभागाला याची माहिती दिली. माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. बिबट्याची पिल्ले सापडली म्हंटल्यावर लोकांनी पाहण्यासाठी गर्दी केली होती. मात्र याच परिसरात मादी असावी असे वन विभागाने सांगितल्यानंतर नागरिकांनी घर गाठले. दरम्यान पिल्लांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ग्रामस्थाना सूचना वनविभागाने दिल्या. त्या परिसरात कॅमेरेही लावण्यात आले. वन विभागाच्या प्रयत्नांना यश आले. रविवारी रात्रीच मादीने आपल्या तीनपैकी दोन पिल्लांना जंगलात सुरक्षित ठिकाणी नेले. कॅमेऱ्यामुळे सारे स्पष्ट झाले.
ही सर्व मोहीम विभागीय वनअधिकारी रत्नागिरी(चिपळूण) गिरिजा देसाई ,सहाय्यक वनसंरक्षक प्रियंका लगड, मानद वन्यजीव रक्षक नीलेश बापट, परिक्षेत्र वनअधिकारी रत्नागिरी किरण ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल देवरुख तौफिक मुल्ला,वनपाल पाली न्हानू गावडे ,वनरक्षक आकाश कडूकर, सहयोग कराडे, अरुण माळी पोलीस पाटील रुपेश कदम यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.