गुहागर:-बुद्धिमत्ता विचारशक्ती भावना या मनुष्यप्राण्याला मिळालेल्या उपजत देणग्या आहेत त्याचा वापर त्याने योग्य तऱ्हेने योग्य वेळी व योग्य ठिकाणी करणे आवश्यक आहे यातून मनुष्य जर सत्प्रवृत्त असेल तर इतरांसाठी काहीतरी करण्याची भावना वाढीस लागते त्याच भावनेतून बिजघर मावळतवाडी येथील व सध्या पुणे येथे वास्तव्यास असलेले राजेश नारायणराव भोसले यांनी त्यांचे मोठे बंधू व बिजघर नंबर १ शाळेचे माजी विद्यार्थी अशोकराव नारायणराव भोसले यांच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या बिजघर नंबर १ शाळेला आपली आई कै. लक्ष्मीबाई नारायणराव भोसले व वडील कै. नारायणराव शिवराम भोसले यांच्या स्मरणार्थ एक संगणक संच व एक गुगल टीव्ही असे पन्नास हजाराचे शैक्षणिक साहित्य दिले.
राजेश नारायणराव भोसले यांचे मोठे बंधू अशोकराव नारायणराव भोसले हे बिजघर नंबर १ शाळेचे माजी विद्यार्थी आहेत त्या शाळेत आपण शिकलो ज्या मातीत आपण लहानाचे मोठे झालो.त्या मातीचे आपण देणे लागतो ही भावना मनात ठेवून त्यांनी शाळेला ही देणगी दिली ती देणगी मिळवून देण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष भगवान जंगम यांनी प्रयत्न केले.नुकताच हा संगणक संच व गुगल टीव्ही राजेश नारायणराव भोसले यांचे बंधू शैलेश भोसले व यशवंतराव भोसले यांच्या शुभहस्ते शाळेला प्रदान करण्यात आला.
यावेळी गावचे मानकरी सुनील भोसले शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष भगवान जंगम सामाजिक कार्यकर्ते कमलेश भोसले बिजघर कोंडवाडी येथील रामचंद्र गायकवाड अंगणवाडी सेविका कुंदा पार्टे भगवान भोसले निलेश विचारे माजी विद्यार्थिनी मानसी भोसले व बिजघर गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भाग्यश्री काणेकर विजय सकपाळ संदीप घाणेकर व शैलेश पराडकर यांनी मेहनत घेतली