कृषी कन्या सौ. श्रद्धा ढवण-ढोरमले शेतकऱ्यांना करणार मार्गदर्शन
चिपळूण:- वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स प्रा. लि. तर्फे शेतकरी मेळावा व कृषी कार्यशाळा शुक्रवार दिनांक २३ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता देवरुख येथील शंकरशेठ माटे व चंद्रकांत भोजने सभागृहात आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाचे अध्यक्ष प्रशांत यादव, मुख्य प्रवर्तक सौ. स्वप्ना यादव यांनी दिली.
वाशिष्ठी डेअरी प्रकल्प सुरू झाल्यापासून शेतकऱ्यांना शेतीपूरक दुग्ध व्यवसायाबरोबरच अन्य कृषीशी निगडित असलेल्या व्यवसायांची माहिती मिळावी, यासाठी पुढाकार घेतला जात आहे. यानुसार दिनांक ५ ते ७ जानेवारी रोजी कृषी, पशुसंवर्धन २०२४ आयोजित केले गेले. या महोत्सवाला शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तर कोकणवासीयांनी या महोत्सवाचे भरभरून कौतुक केले. इतक्यावरच ते थांबले नाहीत तर २ जुलै रोजी कृषी प्रणेते स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीदिनी कृषी दिनानिमित्त कृषी मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी शेतकऱ्यांना दापोली कृषी विद्यापीठातील भाजी तज्ञांकडून भाजीपाला लागवड संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. तसेच शेतकऱ्यांना भाजीपाला बियाणे व खते वितरित करण्यात आले. या मेळाव्याचे देखील शेतकऱ्यांनी कौतुक केले.
तर आता वाशिष्ठी डेअरी प्रकल्पातर्फे शुक्रवार दिनांक २३ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता देवरुख येथील शंकरशेठ माटे व चंद्रकांत भोजने साहेब सभागृहात शेतकरी मेळावा व कृषी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
यावेळी कृषी कन्या सौ. श्रद्धा ढवण-ढोरमले आधुनिक शेती सेंद्रिय पद्धतीने करण्याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. तर या कार्यक्रमाला पुणे येथील एडवेटा इंटरप्राईजेस लिमिटेड कंपनीचे डेप्युटी जनरल मॅनेजर पांडुरंग पाटील तर कोल्हापूर येथील उप-वारा व्यवस्थापन आणि तांत्रिक मार्गदर्शक टेरिटरी मॅनेजर प्रतिक माने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. तरी शेतकरी मेळावा व कृषी कार्यशाळेला शेतकऱ्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाचे अध्यक्ष प्रशांत यादव व मुख्य प्रवर्तक सौ. स्वप्ना यादव यांनी केले आहे.